Miscreants Misbehave With Couple Video: लज्जास्पद! बिहारच्या गयामध्ये प्रेमी जोडप्यासोबत गैरवर्तन; तरुणीसोबत केले अश्लिल कृत्य (Watch)
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, काही तरुण मुलीला जमिनीवर फेकून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत, तिच्यासोबत अश्लील कृत्य करत आहेत.
बिहारच्या गया येथे काही बदमाश तरुणांनी प्रेमी युगुलाशी खुलेआम गैरवर्तन केल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. एवढेच नाही तर या मुलांनी तरुणीसोबत अश्लील कृत्य करून व्हिडिओही बनवला. हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बिहारच्या गया पोलिसांनी या मुलांविरुद्ध कारवाई केली. व्हिडिओच्या मदतीने आरोपींची ओळख पटवली जात असून लवकरात लवकर सर्वांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. सर्व मुले गावातीलच रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, काही तरुण मुलीला जमिनीवर फेकून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत, तिच्यासोबत अश्लील कृत्य करत आहेत. (हेही वाचा: दिल्लीतील शाहबाद डेअरीमध्ये साक्षीची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या साहिलला उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून अटक)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)