केंद्रीय गृहमंत्रालयाकडून लष्कर - ए- तैय्यबाचा शेख सज्जाद ला  दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. युएपीए अंतर्गत त्याला आता अधिकृतपणे दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे.जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये 2018 साली पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येच्या कटात सज्जादचा सहभाग होता. गेल्या १५ दिवसांत केंद्राकडून दहशतवादी घोषित करण्यात आलेली  शेख सज्जाद  ही सहावी व्यक्ती आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)