Man Dragged By Crocodile: ओडिशात व्यक्तीला मगरीने नदीत ओढून नेले; गावकऱ्यांमध्ये घबराट

त्यांचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक व कुटुंबीय नदीकाठी पोहोचले व त्यांनी नदीपात्रात जाऊन दास यांचा शोध घेतला, मात्र तो प्रयत्न निष्फळ ठरला.

Crocodile

ओडिशातील पट्टामुंडई येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील केंद्रपारा जिल्ह्यातील पट्टामुंडई ब्लॉकमधील पेंथापाला पंचायत अंतर्गत कुलासहीजवळील ब्राह्मणी नदीत एका 55 वर्षीय व्यक्तीला मगरीने गुरुवारी ओढून नेल्याची माहिती आहे. रात्री 8.30 वाजता कुलशी गावातील अमुल्य दास हे नदीकाठी गेले असता मगरीने त्यांना नदीत ओढले. त्यांचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक व कुटुंबीय नदीकाठी पोहोचले व त्यांनी नदीपात्रात जाऊन दास यांचा शोध घेतला, मात्र तो प्रयत्न निष्फळ ठरला. त्यानंतर स्थानिकांनी अग्निशमन दल आणि बचाव दलाला माहिती दिली. काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत शोध सुरू केला. मात्र अंधारामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना बेपत्ता व्यक्तीचा शोध लागला नाही. दरम्यान, मगरीच्या हल्ल्याचे वृत्त समोर आल्यानंतर कुळशी गावाजवळील नदीकाठावर स्थानिकांची मोठी गर्दी झाली आहे. याआधी 29 जून रोजी पट्टामुंडई येथील तारादिपाल घागराडिया गावाजवळ एका वृद्धाला मगरीने नदीत ओढून नेले होते. (हेही वाचा: Thane Road Accident: घोडबंदर रोड वर कंटेनरच्या चाकाखाली येऊन बाईकस्वाराचा मृत्यू)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)