Man Brutally Thrashed by Girlfriend's Family: रात्रीच्या अंधारात प्रेयसीला भेटायला गेला तरुण; मुलीच्या कुटुंबीयांनी केली बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल (Watch)

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, व्यक्ती ट्रंकमधून बहारे पडत आहे, तर कुटुंबातील सदस्य जवळच लाठ्या घेऊन उभे आहेत. हा तरुण हात जोडून विनवणी करत आहे मात्र कुटुंबीय त्याला मारहाण करणे चालूच ठेवतात.

Man Brutally Thrashed by Girlfriend's Family

Man Brutally Thrashed by Girlfriend's Family: उत्तर प्रदेशातील आझमगडमधील देवगाव कोतवाली भागातील सोफीपूर गावात एका प्रियकराला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. रात्रीच्या अंधारात हा तरुण आपल्या प्रेयसीला भेटायला गेला होता. मात्र याबाबत मुलीच्या कुटुंबियांना माहिती मिळाली. त्यांनी मुलीचे रूम तपासली असता, हा तरुण ट्रंकमध्ये लपलेला आढळला त्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तरुणाची सुटका करण्यात आली. मात्र या घटनेबाबत पोलिसांनी आरोपींवर कोणतीही कारवाई केलेली नाही.

कुटुंबातील एका सदस्याने रेकॉर्ड केलेल्या घटनेच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, व्यक्ती ट्रंकमधून बहारे पडत आहे, तर कुटुंबातील सदस्य जवळच लाठ्या घेऊन उभे आहेत. हा तरुण हात जोडून विनवणी करत आहे मात्र कुटुंबीय त्याला मारहाण करणे चालूच ठेवतात. या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलीस अधीक्षक शैलेंद्र लाल सांगतात की, सोशल मीडियावर एका तरुणाला मारहाणीचा एक व्हिडीओ समोर आला होता. याबाबत चौकशी केली असता समोर आले की, एक मुलगा विवाहित महिलेच्या घरात घुसला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी मिळून त्याला मारहाण केली. याचा तपास देवगाव निरीक्षकांकडे सोपविण्यात आला आहे. (हेही वाचा: Gadchiroli Leopard Video: रात्रीच्या अंधारात शिकारीसाठी आला बिबट्या, शिकार करतांना पडला विहिरीत, व्हिडीओ व्हायरल)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now