Congress: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस संघटनेत मोठे फेरबदल, रमेश चेनिथल्ला बनले महाराष्ट्राचे प्रभारी

कर्नाटकमध्ये एच. के. पाटील मंत्री झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्राचे प्रभारी पद रिक्त होतं. यानंतर आता रिक्त पदावर रमेश चेनिथल्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Congress Flag (Photo Credit- PTI)

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस संघटनेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanaka Gandhi) यांच्या जागी अविनाश पांडे यांना यूपी काँग्रेसचे प्रभारी बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्याकडे छत्तीसगडची जबाबदारी देण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये एच. के. पाटील मंत्री झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्राचे प्रभारी पद रिक्त होतं. यानंतर आता रिक्त पदावर रमेश चेनिथल्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजय माकन (Ajay Makan) अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) कोषाध्यक्ष असतील. पक्षाने 12 सरचिटणीस आणि 11 राज्य प्रभारी नियुक्त केले आहेत.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now