Mahakumbh 2025 From Space: पृथ्वीवर परतलेल्या Sunita Williams यांनी अंतराळातून काढले प्रयागराज महाकुंभाचे नयनरम्य फोटो; कुटुंबाला पाठवले होते (See)

, सुनीता यांनी अंतराळ स्थानकावरून प्रयागराज महाकुंभाचे फोटो पाठवले होते. याबाबत महाकुंभाच्या अधिकृत आयडीवरूनही माहिती देण्यात आली आहे.

Mahakumbh 2025 From Space

अंतराळ स्थानकात नऊ महिन्यांहून अधिक काळ घालवल्यानंतर, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर सुरक्षितपणे परतले आहेत. या दोघांना घेऊन एलोन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सचे ड्रॅगन कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सुनीता विल्यम्सच्या सुरक्षित परतीबद्दल जगभरात, विशेषतः भारतात आनंदाची लाट पसरली आहे. गुजरातमधील त्यांचे गाव झुलासनमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता सुनीता विल्यम्सची बहिण फाल्गुनी पंड्या यांनी सांगितले की, सुनीता यांनी अंतराळ स्थानकावरून प्रयागराज महाकुंभाचे फोटो पाठवले होते. याबाबत महाकुंभाच्या अधिकृत आयडीवरूनही माहिती देण्यात आली आहे.

या पोस्टमध्ये लिहिले आहे, ‘महाकुंभाचे फोटो आणल्याबद्दल सुनीता विल्यम्सचे अभिनंदन. वसुधैव कुटुंबकमची पवित्र भावना पुन्हा एकदा प्रत्यक्षात आली आहे.सुनीता विल्यम्स महाकुंभाच्या छायाचित्रांसह 9 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) सुरक्षितपणे पृथ्वीवर परतल्या. सुनीताला पाहण्यासाठी संपूर्ण जग आसुसलेले असताना, त्या आयएसएसमधून प्रयागराजमध्ये सुरू असलेला महाकुंभ पाहत होत्या आणि त्याचे फोटो काढत होत्या. सुनीता विल्यम्सने हे फोटो तिची बहीण फाल्गुनी पांड्याला पाठवले होते. पृथ्वीपासून अंतराळापर्यंत विश्वकल्याणाच्या इच्छेने संपन्न झालेला मानवतेचा महाकुंभ संपूर्ण जगाला हाच संदेश देत आहे.’ (हेही वाचा: Sunita Williams Rehabilitation Program: पृथ्वीवर परतलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि सहकाऱ्यांसाठी 45 दिवस महत्त्वाचे; जाणून घ्या पुनर्वसन कार्यक्रम)

Mahakumbh 2025 From Space:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement