IPL Auction 2025 Live

LPG Cylinder Prices: एलपीजी सिलींडर दरात 100 रुपयांची कपात, जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'X' खात्यावरुन केलेल्या घोषणेनुसार एलपीजी दरात 100 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

LPG Cylinder | (File Image)

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत केंद्र सरकराने एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'X' खात्यावरुन केलेल्या घोषणेनुसार एलपीजी दरात 100 रुपयांची कपात करण्यात आली आहे. पंतपप्रधानांनी आपल्या एक्स हँडलवर म्हटले आहे की, एलपीजी दरात कपात करण्याच्या निर्णयामुळे देशभरातील लाखो कुटुंबांवरील आर्थिक भार लक्षणीयरीत्या कमी होईल. विशेषत: आपल्या नारी शक्तीचा फायदा होईल. स्वयंपाकाचा गॅस अधिक किफायतशीर बनवून, आम्ही कुटुंबांच्या कल्याणासाठी आणि आरोग्यदायी वातावरण सुनिश्चित करण्याचे देखील ध्येय ठेवतो. हे महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांच्यासाठी ‘Ease of Living’ सुनिश्चित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे.

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)