Lok Sabha Security Breach: खलिस्तानी दहशतवादी Gurpatwant Singh Pannun ने जाहीर केली संसदेतील घुसखोरांसाठी 10 लाख रुपयांची कायदेशीर मदत
लोकसभेत कामकाज सुरू असतानाच अज्ञात व्यक्तींनी व्हिजिटर गॅलरीतून सभागृहात प्रवेश केला आणि रंगीत धूर सोडून घोषणाबाजी केली. त्यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ होऊन कामकाज तहकूब करण्यात आले.
खलिस्तानी दहशतवादी गट शीख फॉर जस्टिस (SFJ) चा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नून याने आज संसदेवरील हल्ल्याच्या वर्धापनदिनानिमित्त संसदेच्या सुरक्षेचा भंग करणाऱ्या चार पुरुष आणि एका महिलेला कायदेशीर मदत म्हणून 10 लाख रुपयांची ऑफर दिली आहे. सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. याआधी 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सहा दिल्ली पोलीस कर्मचारी, दोन संसद सुरक्षा कर्मचारी आणि एक माळी ठार झाले. त्यांना आज सर्व खासदारांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. अशात लोकसभेत कामकाज सुरू असतानाच अज्ञात व्यक्तींनी व्हिजिटर गॅलरीतून सभागृहात प्रवेश केला आणि रंगीत धूर सोडून घोषणाबाजी केली. त्यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ होऊन कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतर लोकसभा सचिवालयाच्या विनंतीवरून गृह मंत्रालयाने सीआरपीएफचे महासंचालक अनिश दयाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली संसदेच्या सुरक्षेमध्ये त्रुटी राहिल्याच्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. (हेही वाचा: Lok Sabha Security Breach: संसदेतील घुसखोराला खासदारांनी केली मारहाण; समोर आला व्हिडिओ)
Lok Sabha Security Breach-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)