Lok Sabha Election 2024 Results: राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड दोन्ही मतदारसंघातून विजयी; कोणती जागा ठेवणार व कोणती सोडणार? जाणून घ्या काय म्हणाले (Watch)

केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशमधील रायबरेली या दोन्ही ठिकाणी राहुल गांधींनी विजय मिळवला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर पत्रकार परिषदेत राहुल गांधींना या दोनपैकी कोणती जागा ठेवणार? असा प्रश्न विचारला गेला.

Rahul Gandhi | (Photo Credits: Facebook)

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभा निवडणुकीचे 2024 चे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत समोर आलेल्या ट्रेंडनुसार कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही, म्हणजेच युतीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित आहे. केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशमधील रायबरेली या दोन्ही ठिकाणी राहुल गांधींनी विजय मिळवला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर पत्रकार परिषदेत राहुल गांधींना या दोनपैकी कोणती जागा ठेवणार? असा प्रश्न विचारला असता, त्यासाठी चर्चा, विचार करून निर्णय घ्यावा लागेल, अद्याप काही निश्चित नाही असे त्यांनी सांगितले. राहुल गांधी वायनाडमधून 3 लाख 64 हजार 422 मतांनी विजयी झाले. त्यांना एकूण 6 लाख 47 हजार 445 मते मिळाली. या जागेवर सीपीआय दुसऱ्या स्थानावर आहे. भाजप तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याच वेळी, रायबरेली, यूपीमध्ये त्यांनी 3 लाख 90 हजाराहून अधिक मतांनी विजय मिळवला. इथे भाजपचे दिनेश प्रताप सिंग दुसऱ्या क्रमांकावर राहिले. (हेही वाचा: Lok Sabha Election 2024 Result: अमेठीमधील पराभवानंतर Smriti Irani यांची पहिली प्रतिक्रिया, जाणून घ्या काय म्हणाल्या)

पहा व्हिडिओ- 

 

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now