Lok Sabha Election 2024: कॉंग्रेस नेत्या Priyanka Gandhi महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता; जाणून घ्या सुप्रिया सुळे व यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया (Video)
प्रियंका गांधी यांचे राजकीय सल्लागार आचार्य प्रमोद कृष्णम यांनी ही महिडी दिली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी तयारी सुरु केली आहे. केंद्रातील विद्यमान सरकारचा पाडाव करण्यासाठी 'इंडिया' युतीनेही कंबर कसली आहे. अशात कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी या महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवतील अशी शक्यता समोर येत आहे. प्रियंका गांधी यांचे राजकीय सल्लागार आचार्य प्रमोद कृष्णम यांनी ही महिडी दिली आहे. आचार्य कृष्णमयांनी दिव्य मराठीला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे. या अहवालानंतर राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'प्रियंका गांधी या एक कर्तुत्ववान महिला आहेत. त्यांनी प्रचंड संघर्ष केला आहे. त्या जर महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवणार असतील तर आम्हाला आनंदच आहे.'
याबाबत कॉंग्रेसच्या यशोमती ठाकूर म्हणतात, 'ही एकदम चांगली गोष्ट आहे. असे घडले तर याचे आम्ही स्वागतच करतो. हा मतदारसंघ राखीव आहे म्हणून सांगा, नाहीतर त्यांना म्हटले असते इथूनच लढा.' (हेही वाचा: Bihar Caste Census: बिहारच्या जात जनगणनेच्या निकालांवर चर्चा करण्यासाठी नितीश कुमार यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)