Lok Sabha Election 2024: 400 जागा जिंकल्या तरी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही - अमित शाह
आज मी तुम्हाला मोदी हमी देतो की एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही. किंवा आम्ही इतर कोणालाही ते करू देणार नाही. असे अमित शाह यांनी म्हटले.
कासगंज येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, "राहुल गांधी मागासवर्गीयांच्या नावाने खोटे बोलत आहेत. ते म्हणतात की, भाजपने 400 जागा जिंकल्या तर भाजप देशातील आरक्षण हटवेल. ते काही होणार नाही. आरक्षण हटवण्यासाठी आमच्याकडे पूर्ण बहुमताने दोन टर्म होते, पण नरेंद्र मोदी आरक्षणाचे समर्थक आहेत. आज मी तुम्हाला मोदी हमी देतो की एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही. किंवा आम्ही इतर कोणालाही ते करू देणार नाही."
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)