Lizard Found in Budweiser Beer Bottle: तेलंगणातील विकाराबादमध्ये बडवायझर बिअरच्या बाटलीत आढळला सरडा, व्हिडीओ व्हायरल (Watch)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक पुरुष बाटली हलवताना दिसत आहे, ज्यामध्ये सरडा दिसत आहे. यानंतर लगेचच दोघांनी तक्रार दाखल केली परंतु वाईन शॉप मालकाने त्याकडे दुर्लक्ष केले.

Lizard Found in Budweiser Beer Bottle

Lizard Found in Budweiser Beer Bottle: तेलंगणातील विकाराबाद येथे एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी दोन व्यक्तींना त्यांनी एका कार्यक्रमासाठी खरेदी केलेल्या बिअरच्या बाटलीत एक मृत सरडा सापडला आहे. वृत्तानुसार, केरेली गावातील लक्ष्मीकांत रेड्डी आणि अनंतय्या या दोघांनी धारूरमधील एका स्थानिक वाईन शॉपमधून 4,000 रुपयांची दारू विकत घेतली होती. त्यावेळी बडवायझर बिअरच्या बाटलीत त्यांना मृत सरडा तरंगताना आढळला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक पुरुष बाटली हलवताना दिसत आहे, ज्यामध्ये सरडा दिसत आहे. यानंतर लगेचच दोघांनी तक्रार दाखल केली परंतु वाईन शॉप मालकाने त्याकडे दुर्लक्ष केले. (हेही वाचा: Shocking: ग्राहकांना दिल्या जात होत्या थुंकी मिसळलेल्या रोट्या; किळसवाणा व्हिडिओ व्हायरल, आरोपीला अटक, हॉटेल सील)

बडवायझर बिअरच्या बाटलीत आढळला सरडा-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now