Scary Video: बिबट्याचा भिंतीवरून उडी मारून वन वाहनावर प्राणघातक हल्ला; पहा धक्कादायक व्हिडीओ

बिबट्याने क्वार्टरच्या सीमा भिंतीवरून उडी मारून खासगी वाहनावर हल्ला केला. कारचे विंडशील्ड बंद असल्याने एक मोठा अपघात होता होता टळला.

Scary Video Leopard Attack

एका बिबट्याने वन रक्षक विभागाच्या गाडीवर हल्ला केल्याची एक धक्कादायक घटना आसाममध्ये समोर आली आहे. सुरुवातीला बिबट्याने एक महिला आणि तिच्या दोन मुलींवर हल्ला केला. या सर्वांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना जोरहाट मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. या बिबट्याला  पकडण्यासाठी काही वन कर्मचारी पोहोचल्यावर बिबट्याने त्यांच्या वन वाहनावर उडी मारून वनरक्षकावर हल्ला करण्यास सुरुवात केली. यानंतर रक्षकांनी बिबट्याला घाबरवण्यासाठी सात राऊंड फायर केले. या गोंधळात बिबट्या पळून गेला आणि जोरहाट जिल्ह्यातील सोटाई येथील रेन फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटच्या क्वार्टर कॉरिडॉरमध्ये विश्रांतीसाठी गेला.

त्यानंतर बिबट्याने क्वार्टरच्या सीमा भिंतीवरून उडी मारून खासगी वाहनावर हल्ला केला. कारचे विंडशील्ड बंद असल्याने एक मोठा अपघात होता होता टळला. त्यानंतर बिबट्या जंगलात पळून गेला. अजूनही या बिबट्याचा शोध सुरू आहे. यातील जखमी वनपालाला जोरहाट मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. रेन फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट शेजारील गिबन राखीव जंगलातून बिबट्या आल्याचा संशय आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now