CJI DY Chandrachud: न्यायालयामध्ये वकिलांना आयपॅड आणि लॅपटॉप वापरु दिले पाहिजेत- सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड

वकिलांना कोर्टरुमध्ये आयपॅड आणि लॅपटॉप यांसारखी आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरण्यास परवानगी द्यायला हवी. ते जर चित्रपट पाहात नसतील आणि त्यांना रचनात्मक हेतुसाठी त्याचा वापर करायचा असेल त्यांना ही परवानगी मिळायला हवी,असे भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी म्हटले आहे.

CJI DY Chandrachud: न्यायालयामध्ये वकिलांना आयपॅड आणि लॅपटॉप वापरु दिले पाहिजेत- सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड
Court Hammer | (Photo Credit: Archived, edited, representative images)

वकिलांना कोर्टरुमध्ये आयपॅड आणि लॅपटॉप यांसारखी आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरण्यास परवानगी द्यायला हवी. ते जर चित्रपट पाहात नसतील आणि त्यांना रचनात्मक हेतुसाठी त्याचा वापर करायचा असेल त्यांना ही परवानगी मिळायला हवी,असे भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी म्हटले आहे. सरन्यायाधीश म्हणाले की, न्यायालयातील शिस्त आणि शिष्टाचार इतक्या प्रमाणात ताणले जाऊ नये जेणेकरून कोर्टरूममध्ये अशा उपकरणांवर पूर्ण बंदी असेल. आपण लोकांवर विश्वास ठेवला पाहिजे. कनिष्ठ आणि तरुण वकिलांना आयपॅडवर काम करु दिले पाहिजे. जोपर्यंत ते चित्रपट अथवा इतर गोष्टी केल्याचे आढळत नाही तोर्यंत, असेही न्यायाधीश म्हणाले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 03, 2023 10:27 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).