Uttrakhand राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यात भूस्खलन, तिघांचा मृत्यू, 17 बेपत्ता

स्थानिकांच्या माहितीला अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला.

Rudraprayag landslide | (Photo Credit: ANI)

उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले आहे. या भूस्खलनात तीन जणांचा मृत्यू झाला असून सतरा जण बेपत्ता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली आहे. रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रुद्रप्रयागच्या गौरीकुंडमध्ये केदारनाथ पासून 16 किमी अंतरावर घडली.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीमध्ये म्हटेल आहे की, डोंगरावरून खाली आलेल्या मातीच्या मोठ्या ढिगाऱ्यात रस्त्याच्या कडेला असलेली दोन दुकाने आणि ढाबे वाहून गेले. स्थानिकांच्या माहितीला अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला. भूस्खलनाच्या वेळी या दुकानांमध्ये आणि ढाब्यांमध्ये चार स्थानिक लोक आणि 16 नेपाळी वंशाचे लोक उपस्थित होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)