Lalbaugcha Raja 2022 Day 1, Live Streaming: घरबसल्या घ्या लालबागच्या राजाचे दर्शन, 'या' ठिकाणी पहा गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसाचे लाईव्ह स्ट्रिमिंग

तुम्ही घरबसल्याही लालबागच्या राजाचे दर्शन घेऊ शकता, आरती पाहू शकता.

Lalbaugcha Raja 2022 First Look

मुंबईमधील प्रसिद्ध गणपती लालबागचा राजा हा जगभरातील अनेकांचे श्रद्धास्थान आहे. नवसाला पावणारा अशी या गणपतीची ख्याती आहे. आजपासून सुरु झालेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर भाविक बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आतुरले आहेत. अशात तुम्ही घरबसल्याही लालबागच्या राजाचे दर्शन घेऊ शकता, आरती पाहू शकता. लालबाग राजाच्या मंडळाने भाविकांसाठी लाईव्ह स्ट्रिमिंगचे आयोजन केले आहे. यामुळे भाविक ऑनलाईन पद्धतीने लालबागच्या राजाचे दर्शन घेऊ शकतात.

दरम्यान, यंदा लालबागच्या राजाचा प्रसाद ॲानलाईन माध्यमातून जिओ मार्ट (Jio Mart) व पेटीएम (Paytm) यांच्या सहकार्याने भाविकांच्या घरोघरी पोहचवण्याचा यावर्षी प्रयत्न केला जाणार आहे.

घ्या लालबागच्या राजाचे गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी दर्शन-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)