सिगारेट ओढत राष्ट्रगीत गाणाऱ्या कोलकाताच्या दोन मुलींवर गुन्हा दाखल

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, त्यानंतर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटत असताना, मुलींनी फेसबुकवरून व्हिडिओ डिलीट केला.

Kolkata Girl

सिगारेट ओढताना भारताच्या राष्ट्रगीताची विटंबना केल्याप्रकरणी कोलकाता येथील दोन मुलींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.व्हिडिओ व्हायरल होताच कोलकाता उच्च न्यायालयाच्या वकिलासह अनेक नेटकऱ्यांनी मुलींवर कारवाई करण्याची मागणी केली. रविवारी बॅरकपूर सायबर सेलमध्ये राष्ट्रगीताची विटंबना केल्याप्रकरणी दोन मुलींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

बॅरकपूर आयुक्तालयाच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी दोन्ही मुलींचे जबाब नोंदवले आहेत तसेच तपास करणारी एजन्सी फेसबुकच्या संपर्कात आहे. असेही सांगितले.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, त्यानंतर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटत असताना, मुलींनी फेसबुकवरून व्हिडिओ डिलीट केला. या व्हिडिओमध्ये मुली हातात सिगारेट घेऊन बसून राष्ट्रगीत गाताना दिसत आहेत. या दोन्ही मुली अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे.  या दोघींनी आपल्या फेसबुकवरुन भारतीय राष्ट्रगीताचे विडंबन केले होते. या नंतर सोशल मिडीयावर  या दोघांच्या विरोधात लोकांनी जोरदार विरोध दर्शवला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now