Karnataka Elections 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक राज्यातील चित्रदूर्ग येथे वाजवले पारंपरिक वाद्य

E-Shivneri Bus (संग्रहित संपादित प्रतिमा)

कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारातील रंगत आता वाढत आहे. सर्वच राजकीय पक्षांचे नेते या निवडणूक प्रचारासाठी उतरले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील भाजपच्या वतीने निवडणूक प्रचारात उतरले आहेत. आज त्यांनी कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येते भेट दिली. या भेटीत त्यांनी पारंपरिक वाद्य वाजविण्याचा आनंद लुटला. या वेळी उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनीही त्यांचे जोरदार स्वागत केले.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांनी देखील कर्नाटक निवडणूक प्रचारात सक्रीय सहभाग नोंदवला आहे. प्रियंका गांधी यांनी नुकतीच एका ठिकाणी डोसा बनविण्याची पद्धत शिकून घेतली आणि राहुल गांधी यांनीही काही मंदिरांना भेटी दिल्या आणि स्थानिकांशी संवाद साधला. या सर्व घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)