Jyotiraditya Scindia यांच्या लोकसभा प्रचारात Mahaaryaman Scindia ने केले ट्रॅक्टर रॅली चं सारथ्य (Watch Video)
पिचोरच्या सेमरी गावात त्यांच्यासाठी निघालेल्या एका मोठ्या ट्रॅक्टर रॅलीचे नेतृत्व आज ज्योतिरादित्य सिंधिया यांचा मुलगा महाआर्यमन सिंधिया यांनी केलं.
केंद्रीय मंत्री आणि गुना लोकसभेतील भाजपचे उमेदवार ज्योतिरादित्य सिंधिया यांचा मुलगा महाआर्यमन सिंधिया लोकसभा निवडणुकीत वडिलांसाठी मोठ्या प्रमाणावर प्रचार करत आहे. आज त्यांनी चंदेरी आणि पिचोर विधानसभा मतदारसंघातील 10 हून अधिक गावांमध्ये प्रचार केला आणि जाहीर सभा घेतल्या. पिचोरच्या सेमरी गावात त्यांच्यासाठी निघालेल्या एका मोठ्या ट्रॅक्टर रॅलीचे नेतृत्वही त्याने अनेक किलोमीटरपर्यंत ट्रॅक्टर चालवून केले.
ट्रॅक्टर चालवताना महाआर्यमन सिंधिया
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)