J&K Encounter: जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे दहशतवाद्यांनी एका ग्रामसंरक्षण रक्षकाला केले लक्ष्य, सुरक्षा दलांनी दिले प्रत्युत्तर
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना नुकतेच शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जवळच्या लष्कराच्या तुकडीने प्रत्युत्तर दिले, त्यानंतर गोळीबार सुरू झाला. सध्या ही कारवाई सुरूच आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आज राजौरी जिल्ह्यातही दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. येथे, गुंडा खवास भागातील ग्राम संरक्षण समितीच्या (व्हीडीसी) घराला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे. लेफ्टनंट कर्नल सुनील बारतवाल यांनी सांगितले की, आज पहाटे 3 वाजता राजौरीतील गुंडा गावात व्हिलेज डिफेन्स गार्ड (व्हीडीसी) पुरुषोत्तम कुमार यांच्या घरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना नुकतेच शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जवळच्या लष्कराच्या तुकडीने प्रत्युत्तर दिले, त्यानंतर गोळीबार सुरू झाला. सध्या ही कारवाई सुरूच आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)