Jammu & Kashmir: दहशतवादी हल्ल्यात टीव्ही अभिनेत्री Amreen Bhat चा मृत्यू; 10 वर्षांचा पुतण्या जखमी

गंभीर जखमी अवस्थेत अमरीनचा एसएमएचएस रुग्णालयात जाताना मृत्यू झाला

Jammu & Kashmir: दहशतवादी हल्ल्यात टीव्ही अभिनेत्री Amreen Bhat चा मृत्यू; 10 वर्षांचा पुतण्या जखमी
Amreen Bhat (संग्रहित संपादित प्रतिमा)

मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील चदूराच्या हिश्रू भागात टीव्ही अभिनेत्री अमरीन भटच्या घरात घुसून दहशतवाद्यांनी तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तिचा 10 वर्षांचा पुतण्या जखमी झाला. घटनेनंतर दोघांनाही ताबडतोब चदूरा रुग्णालयात हलवण्यात आले, तेथून अमरीनला एसएमएचएस रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, गंभीर जखमी अवस्थेत अमरीनचा एसएमएचएस रुग्णालयात जाताना मृत्यू झाला. एसएमएचएस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ कंवलजीत सिंग यांनी सांगितले की, ‘अमरीनचा रुग्णालयात येण्याआधीच मृत्यू झाला होता.’

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 25, 2022 10:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).