ITR Filing Data: आयकर विभागाचा नवीन विक्रम; 31 जुलैपर्यंत 6.77 कोटींहून अधिक आयटीआर दाखल
माहितीनुसार, 31 जुलैच्या मध्यरात्री12 पर्यंत, 2022-23 या आर्थिक वर्षासाठी देशात 6,77,42,303 कोटी आयकर रिटर्न भरले गेले आहेत. म्हणजेच 2023-24 या मूल्यांकन वर्षासाठी देशात 6.77 कोटी पेक्षा जास्त आयटीआर फाइलिंग झाल्या आहेत.
काल म्हणजेच 31 जुलै रोजी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख होती. यावेळी आयटीआर फाइलिंगचा नवा रेकॉर्ड तयार झाला आहे. आयकर विभागाच्या www.incometax.gov.in या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 31 जुलैच्या मध्यरात्री12 पर्यंत, 2022-23 या आर्थिक वर्षासाठी देशात 6,77,42,303 कोटी आयकर रिटर्न भरले गेले आहेत. म्हणजेच 2023-24 या मूल्यांकन वर्षासाठी देशात 6.77 कोटी पेक्षा जास्त आयटीआर फाइलिंग झाल्या आहेत, हा एक विक्रम आहे. वैयक्तिक करदाते आणि युनिट्ससाठी आयकर भरण्याचा हा मोठा रेकॉर्ड आहे. आयकर विभागाच्या ट्विटनुसार, या श्रेणीसाठी गेल्या वर्षी म्हणजे आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये एकूण 5.83 कोटी आयटीआर दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, जर तुम्ही आयकर विभागाच्या कलम 139(1) अन्वये अंतिम मुदतीत आयटीआर दाखल करण्यात अयशस्वी झाल्यास, कलमांतर्गत 234F दंड म्हणून 5,000 रुपये विलंब शुल्क भरावा लागू शकतो. (हेही वाचा: Hero MotoCorp चे अध्यक्ष Pawan Munjal यांच्या घरी ED ची छापेमारी)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)