iPhone 16 Pro Max: दिल्ली विमानतळावर तब्बल 26 आयफोन 16 प्रो मॅक्स फोन्ससह महिलेला अटक; जाणून घ्या काय आहे प्रकरण

एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुप्त माहिती मिळाल्यानंतर सीमाशुल्क विभागाने दिल्ली विमानतळावर थांबून हाँगकाँगहून येणाऱ्या महिला प्रवाशाची झडती घेतली.

Representational Image (Photo Credits: File Image)

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी, मंगळवारी आयफोन 16 प्रो मॅक्सची तस्करी करणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेतले. हाँगकाँगहून दिल्लीला तब्बल 26 आयफोन 16 प्रो मॅक्स फोन्सची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या महिला प्रवाशाला अटक केली. आयफोन 16 सिरीज मागील महिन्यात लॉन्च करण्यात आली होती आणि प्रो मॅक्स हा त्यातील सर्वात प्रीमियम फ्लॅगशिप फोन आहे. रिपोर्ट्सनुसार, कस्टम अधिकाऱ्यांना आधीच माहिती होती की, ही महिला फोन आणत होती. त्यामुळे ती भारतात आल्यावर पकडली गेली.

फोन एका छोटय़ा पिशवीत लपवून ठेवले होते आणि त्यावर टिश्यू पेपर गुंडाळले होते जेणेकरून ते कोणाला दिसू नये. एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुप्त माहिती मिळाल्यानंतर सीमाशुल्क विभागाने दिल्ली विमानतळावर थांबून हाँगकाँगहून येणाऱ्या महिला प्रवाशाची झडती घेतली. झडतीदरम्यान तिच्या व्हॅनिटी बॅगमधून 26 आयफोन 16 प्रो मॅक्स फोन्स सापडले. (हेही वाचा: Lucknow Delivery Boy Murder: फुकटात मोबाईल मिळवण्याच्या नादात डिलिव्हरी बॉयची हत्या; मृतदेहाचे तुकडे करून कालव्यात फेकले, लखनौ येथील घटना)

आयफोन 16 प्रो मॅक्स फोन्ससह महिलेला अटक-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now