IndiGo Flight Ticket Booking on WhatsApp: आता व्हॉट्सॲपवर बुक करू शकाल विमान तिकिटे; इंडिगोने लॉन्च केला 6Eskai चॅटबॉट

आता फ्लाइटचे तिकीट बुक करणे, चेक-इन करणे, बोर्डिंग पास घेणे, फ्लाइटची स्थिती तपासणे किंवा प्रवासाशी संबंधित कोणत्याही प्रश्नांची उत्तरे मिळवणे, हे सर्व फक्त व्हॉट्सॲपवर करता येईल.

IndiGo Flight | (Photo Credit - ANI/X)

IndiGo Flight Ticket Booking on WhatsApp: आता इंडिगोची विमान उड्डाणे बुक करणे अधिक सोपे झाले आहे. नुकतेच इंडिगोने आपला नवीन एआय बुकिंग असिस्टंट, 6Eskai हा व्हॉट्सॲपवर लॉन्च केला आहे. याच्या मदतीने तुम्ही आता मित्रांसोबत गप्पा मारत प्रवासाचे नियोजन करू शकता. आता फ्लाइटचे तिकीट बुक करणे, चेक-इन करणे, बोर्डिंग पास घेणे, फ्लाइटची स्थिती तपासणे किंवा प्रवासाशी संबंधित कोणत्याही प्रश्नांची उत्तरे मिळवणे, हे सर्व फक्त व्हॉट्सॲपवर करता येईल. हिंदी, इंग्रजी किंवा तमिळ भाषेमध्ये तुम्ही याच्याशी संवाद साधू शकता. 6Eskai वापरण्यासाठी, फक्त +91 7065145858 वर व्हॉट्सॲप संदेश पाठवा. 6Eskai तुमच्या इंडिगो एअरलाईनशी निगडीत कोणत्याही प्रवासाच्या गरजा पूर्ण करेल. (हेही वाचा: Google's Gemini AI App Launched in India: प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर गुगलने भारतात लाँच केले एआय जेमिनी ॲप; मिळणार 9 भारतीय भाषांचा सपोर्ट)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)