IndiGo flight: दिल्लीहून रांचीला जाणारे इंडिगो विमान तांत्रिक बिघाडानंतर परतले, सर्व प्रवासी सुरक्षित

इंडिगोच्या विमानाने सकाळी 7.40 वाजता राजधानी दिल्लीतून उड्डाण केले आणि तांत्रिक बिघाडानंतर ते 8.20 वाजता परतले.

Indigo Flight (PC - Wikimedia Commons)

दिल्लीहून रांचीला जाणारे इंडिगो विमान तांत्रिक बिघाडानंतर पुन्हा दिल्ली विमानतळावर लँडींग करण्यात आले. रांचीला जाणारे इंडिगो फ्लाइट 6E 2172 शनिवारी सकाळी टेक ऑफच्या तासाभरात तांत्रिक बिघाडामुळे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर परतले, असे एअरलाइन्सच्या अधिकाऱ्याने सांगितले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. इंडिगोच्या विमानाने सकाळी 7.40 वाजता राजधानी दिल्लीतून उड्डाण केले आणि तांत्रिक बिघाडानंतर ते 8.20 वाजता परतले. सध्या सर्व प्रवाशांना दुसऱ्या विमानाने रांचीला पाठवण्याची तयारी सुरू आहे.

पाहा ट्विट -