India’s Retail Inflation Data: डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर 5.69 टक्के; चार महिन्यांतील उच्चांकावर

गेल्या महिन्यात किरकोळ महागाई दर 5.69 टक्के होता, तर नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाई 5.55 टक्के होती.

Inflation (Pic Credit: IANS)

India’s Retail Inflation in December: खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे किरकोळ महागाईचा दर गेल्या महिन्यात 5.69 टक्क्यांसह चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. डिसेंबर महिन्याची किरकोळ महागाईची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या महिन्यात किरकोळ महागाई दर 5.69 टक्के होता, तर नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाई 5.55 टक्के होती. यासह डिसेंबर अन्नधान्य महागाई दर 9.53 टक्के होता, जो नोव्हेंबरमध्ये 8.70 टक्के होता. ग्रामीण भागातील महागाई 5.93 टक्के होती जी नोव्हेंबरमध्ये 5.85 टक्के होती. शहरी महागाई 5.46 टक्के होती, जी नोव्हेंबरमध्ये 5.26 टक्के होती. कंझ्युमर प्राइस इंडेक्स (CPI) वर आधारित महागाई नोव्हेंबर 2023 मध्ये 5.55 टक्के आणि डिसेंबर 2022 मध्ये 5.72 टक्के होती. (हेही वाचा: India's First Bullet Train: देशातील पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये धावणार; रेल्वेमंत्री Ashwini Vaishnaw यांची माहिती)