Indian Govt Advisory For Students in Canada: तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडामध्ये राहणारे विद्यार्थी आणि नागरिकांसाठी नियमावली केली जाहीर

भारतीय नागरिकांना कॅनडातील ज्या ठिकाणी अशा घटना होत आहेत अशा ठिकाणी आणि संभाव्य ठिकाणी प्रवास टाळण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.

India - Canada | Twitter

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या वक्तव्यानंतर कॅनडात राहणाऱ्या भारतीयांचा तणाव वाढला आहे. दरम्यान, बुधवारी परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी एक नियमावली जारी केली आहे. कॅनडात राहणारे भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना तेथील वाढत्या भारतविरोधी कारवाया आणि हिंसाचार पाहता अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जे नागरिक कॅनडाला जाणार आहेत त्यांनीही काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.  भारतीय नागरिकांना कॅनडातील ज्या ठिकाणी अशा घटना होत आहेत अशा ठिकाणी आणि संभाव्य ठिकाणी प्रवास टाळण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)