Saharanpur Train Derailed: सहारनपूरमध्ये पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली, अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये रविवारी रेल्वे अपघाताची घटना समोर आली आहे. ज्यात एक पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Photo Credit: X

Saharanpur Train Derailed: उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये रविवारी रेल्वे अपघाताची घटना समोर आली आहे. ज्यात एक पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनचे दोन डबे रुळावरून घसरून दुसऱ्या रुळावर गेले. ही ट्रेन दिल्लीहून सहारनपूरच्या दिशेने जात होती.या घटनेनंतर रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मदतकार्य सुरू केले. गेल्या महिन्यातही रेल्वे अपघात झाला होता, आज आंध्र प्रदेशातील विशाखा रेल्वे स्थानकावर रेल्वेला आग लागल्याची घटना समोर आली आहे. सातत्याने होणाऱ्या रेल्वे अपघातांमुळे रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.हेही वाचा: Shatabdi Express Stone Pelting Incident: शताब्दी एक्स्प्रेस ट्रेनवर दगडफेक, खिडक्यांचे नुकसान, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement