India Expels 6 Canadian Diplomats: कॅनडाविरोधात भारताचा मोठा निर्णय; भारतामधील 6 राजनैतिक अधिकाऱ्यांना 19 ऑक्टोबरपूर्वी देश सोडण्यास सांगितले

यासह परराष्ट्र मंत्रालयाने सायंकाळी उशिरा निर्णय घेत, कॅनडाच्या 6 राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे.

Canadian Prime Minister Justin Trudeau and PM Narendra Modi (Photo Credits: X/@NorbertElikes)

India Expels 6 Canadian Diplomats: भारत आणि कॅनडामधील वाद अधिक वाढत चालला आहे. सोमवारी, भारत सरकारने कॅनडातून आपल्या उच्चायुक्तांना परत बोलावण्याची घोषणा केली. यासह परराष्ट्र मंत्रालयाने सायंकाळी उशिरा निर्णय घेत, कॅनडाच्या 6 राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. आता त्यांना शनिवार म्हणजेच 19 ऑक्टोबरपूर्वी भारत सोडावा लागणार आहे. त्यात कॅनडाचे कार्यकारी उच्चायुक्त स्टीवर्ट रॉस व्हीलर आणि उप उच्चायुक्त पॅट्रिक हेबर्ट यांचा समावेश आहे. यासोबतच फर्स्ट सेक्रेटरी मेरी कॅथरीन जोली, फर्स्ट सेक्रेटरी लॅन रॉस डेव्हिड ट्राइट्स, फर्स्ट सेक्रेटरी ॲडम जेम्स चुइप्का आणि फर्स्ट सेक्रेटरी पाउला ओरजुएला यांचा समावेश आहे. यासह भारताने कॅनडातून आपले उच्चायुक्त संजय कुमार वर्मा आणि इतर राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.

कॅनडाने भारतासोबत सामायिक केलेल्या 'डिप्लोमॅटिक कम्युनिकेशन'मध्ये, कॅनडातील भारताचे उच्चायुक्त संजय कुमार वर्मा आणि इतर भारतीय मुत्सद्दींवर, जून 2023 मध्ये खलिस्तान समर्थक कार्यकर्ते हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमध्ये सहभाग असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर भाराताने हा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा; India Withdraws Envoy, Diplomats in Canada: 'ट्रूडो सरकारवर विश्वास नाही'; भारताने कॅनडातून उच्चायुक्त आणि इतर राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावले)

India Expels 6 Canadian Diplomats: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif