PM Modi On Myanmar and Thailand Earthquake: 'भारत सर्वतोपरी मदती साठी सज्ज'- पीएम नरेंद्र मोदी

म्यानमार मध्ये झालेला भूकंप सुमारे 7.7 रिश्टल स्केलचा होता अशी माहिती समोर आली आहे.

Narendra Modi | X

म्यानमार मध्ये भूकंपाचे मोठे धक्के जाणवल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे. म्यानमार आणि थायलंड मध्ये भूकंपामुळे मोठ्या नुकसानाचा अंदाज आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताकडून मदतीचा हात पुढे केला जाईल असे पीएम मोदी म्हणाले आहेत. थायलंडची राजधानी बँकॉकसह अनेक भागांना भूकंपाचा धक्का बसला आहे. बँकॉकमध्ये पुढील आठवड्यात होणाऱ्या BIMSTEC regional grouping summit चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला मोदी आणि इतर नेते उपस्थित राहणार आहेत. Earthquake In Delhi-NCR: म्यानमारमध्ये 7.2 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप, दिल्ली-एनसीआरमध्येही हादरे, बँकॉकला धक्के 

पीएम मोदी यांची पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement