IMD Twitter Account Hacked: भारतीय हवामान खात्याचे ट्विटर अकाउंट हॅक; हॅकर्सने केले 10,100 पेक्षा जास्त ट्विट
हॅकर्सनी ट्विटर अकाउंट हॅक करून त्यावर NFT ट्रेडिंग सुरू केली आहे
भारतीय हवामान खात्याचे ट्विटर अकाउंट हॅक झाले आहे. हॅकर्सने खाते हॅक केल्यापासून जवळजवळ 10,100 पेक्षा जास्त ट्विट केले आहेत. हॅकर्सनी ट्विटर अकाउंट हॅक करून त्यावर NFT ट्रेडिंग सुरू केली आहे. याठिकाणी एक पोस्ट पिन केली आहे, ज्यामध्ये नमूद केले आहे की, 'बीन्झ ऑफिशियल कलेक्शन समोर आल्याच्या निमित्ताने, आम्ही समुदायातील सर्व सक्रिय NFT ट्रेडर्ससाठी पुढील 2 तासांसाठी एक एअरड्रॉप खुला केला आहे.'
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)