Telangana Fire: तेलंगणामधील सरकारी औष्णिक वीज केंद्राला लागली भीषण आग (Watch Video)
बॉयलरमधून जाणार्या केबलमधून शॉर्ट सर्किट झाल्याचा अंदाज आहे. सध्या या प्रकल्पातून वीजनिर्मिती थांबली आहे.
तेलंगणा राज्यातील पेड्डापल्ली जिल्ह्यातील तेलंगणा स्टेट पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन (टीएसजेएनसीओ) द्वारे देखभाल केलेल्या रामागुंडम थर्मल पॉवर स्टेशनला बुधवारी भीषण आग लागली. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. बचाव अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. अधिका-यांनी घटनेच्या तपशीलांबद्दलच्या प्रश्नांना उत्तर दिले नसले तरी, बॉयलरमधून जाणार्या केबलमधून शॉर्ट सर्किट झाल्याचा अंदाज आहे. सध्या या प्रकल्पातून वीजनिर्मिती थांबली आहे.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)