Hottest Place In India: राजस्थानमध्ये पारा 50 अंश सेल्सिअसवर; Phalodi ठरले देशातील सर्वात उष्ण ठिकाण

राजस्थान राज्यात उष्माघाताने आतापर्यंत एकूण 18 जणांचा मृत्यू झाला आहे. बाडमेरमध्ये 48.8 अंश, जैसलमेरमध्ये 48 अंश आणि राजधानी जयपूरमध्ये 43.8 अंश तापमानाची नोंद झाली.

Heat Wave प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Hottest Place In India: राजस्थानमध्ये अजूनही उष्णतेची लाट कायम आहे. शनिवारी फलोदी आणि नौतापा येथील कमाल तापमान 50 अंश सेल्सिअसवर पोहोचले. यापूर्वी 2016 मध्ये येथे कमाल तापमान 51 अंश नोंदवले गेले होते. अशाप्रकारे फलोदी हे देशातील सर्वात उष्ण ठिकाण ठरले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानची स्थितीही अत्यंत वाईट आहे. तेथील अनेक जिल्ह्यांचे तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे, जे पृथ्वीवरील सर्वात उष्ण शहरे ठरले आहेत. पाकिस्तानच्या हवामान खात्याने म्हटले आहे की, गुरुवारी सिंधमधील जेकोबाबाद जिल्ह्यात पारा 50 अंश सेल्सिअसपर्यंत वाढला, जे या वर्षातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान आहे.

दरम्यान, राजस्थान राज्यात उष्माघाताने आतापर्यंत एकूण 18 जणांचा मृत्यू झाला आहे. बाडमेरमध्ये 48.8 अंश, जैसलमेरमध्ये 48 अंश आणि राजधानी जयपूरमध्ये 43.8 अंश तापमानाची नोंद झाली. येत्या तीन दिवसांत राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (हेही वाचा: Madhya Pradesh News: उष्माघातामुळे दोन चिमुकल्यांचा मृत्यू, मध्यप्रदेशातील गंधवानी येथील घटना)

पहा पोस्ट- 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement