HC on Wife's Streedhan: पत्नीच्या संमतीशिवाय तिचे दागिने गहाण ठेवणे हा गुन्हेगारी विश्वासभंग; Kerala High Court ने पतीला ठरवले दोषी
पतीने दागिने लॉकरमध्ये ठेवण्याऐवजी पत्नीच्या संमतीशिवाय गोल्ड लोन कंपनीत गहाण ठेवून कर्ज घेतले.
केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए बद्रुद्दीन यांच्या एकल खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. पत्नीच्या संमतीशिवाय पतीने पत्नीचे सोने गहाण ठेवणे, हा कलम 406 अंतर्गत गुन्हा आहे. याबाबत पत्नीने तक्रार दाखल केली होती. केरळ उच्च न्यायालयाने पतीला, पत्नीला 'स्त्रीधन' म्हणून मिळालेले दागिने तिच्या संमतीशिवाय गहाण ठेवल्याबद्दल विश्वास भंगाचा गुन्हा म्हणून दोषी ठरवले. न्यायमूर्ती ए. बदरुद्दीन म्हणाले की, या प्रकरणात गुन्हेगारी विश्वासाचे उल्लंघन करणारे सर्व घटक (IPC चे कलम 406) सिद्ध झाले आहेत.
केरळ उच्च न्यायालयाने आरोपी पतीला सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणात, अपीलकर्त्या पतीच्या पत्नीला तिच्या आईकडून दागिने मिळाले होते जे तिने लॉकरमध्ये ठेवण्यासाठी पतीला दिले होते. पतीने दागिने लॉकरमध्ये ठेवण्याऐवजी पत्नीच्या संमतीशिवाय गोल्ड लोन कंपनीत गहाण ठेवून कर्ज घेतले. याबाबत सत्र न्यायालयाने पतीला दोषी ठरवत, सहा महिन्यांची शिक्षा आणि पाच लाख रुपये दंड ठोठावला होता. या निर्णयाला पतीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र उच्च न्यालयाने पतीला दिलासा देण्यास नकार दिला. (हेही वाचा: Supreme Court on Indian citizenship: परदेशी नागरिकांची मुले पुन्हा भारतीय नागरिकत्व घेऊ शकत नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय)
HC on Wife's Streedhan:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)