HC On Rape On Pretext Of Marriage: बलात्कार प्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय, '... तर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याच्या आरोपाला महत्त्व राहणार नाही'

मुलीने पुरुषावर 'लग्नाच्या बहाण्याने बलात्कार' केल्याच्या आरोप केला होता, परंतु आता कोर्टाने पुरुषाची निर्दोष मुक्तता केली आहे.

HC On Rape On Pretext Of Marriage: बलात्कार प्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय, '... तर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याच्या आरोपाला महत्त्व राहणार नाही'
Court | (Photo Credits-File Photo)

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका बलात्कार प्रकरणात ट्रायल कोर्टाने पुरुषाची निर्दोष मुक्तता केलेल्या आदेशावर शिक्कामोर्तब करताना म्हटले की, जर एखादी स्त्री पुरुषाचे दुसऱ्या स्त्रीशी लग्न झाल्यानंतरही त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत राहिली, तर 'लग्नाच्या बहाण्याने बलात्कार' केल्याच्या आरोपाला महत्त्व राहणार नाही. अशावेळी लग्नाच्या बहाण्याने सेक्ससाठी संमती मिळवली गेली हा आरोप त्याचे महत्त्व गमावून बसतो.

माहितीनुसार, अभियोक्ता ही एक सुशिक्षित मुलगी आहे, तिने सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले आहे. तिला हे वास्तव चांगलेच ठाऊक होते की, प्रतिवादी पुरुषाने दुसर्‍या महिलेशी लग्न केले होते. त्यामुळे तिचा या पुरुषाशी विवाह शक्य नव्हता. तिला सर्व परिणामांची जाणीव असूनही, तिने विवाहित पुरुषाबरोबर शारीरिक संबंध सुरु ठेवले. त्यानंतर या मुलीने पुरुषावर 'लग्नाच्या बहाण्याने बलात्कार' केल्याच्या आरोप केला होता. परंतु आता कोर्टाने पुरुषाची निर्दोष मुक्तता केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us Share Now
Advertisement