HC on Matrimonial Dispute: 'सहिष्णुता हा विवाहाचा पाया आहे, मात्र अनेकदा पत्नीचे कुटुंब तिळाचा डोंगर करतात'- Gujarat High Court

न्यायमूर्ती दिव्येश ए जोशी यांच्या एकल न्यायमूर्तींच्या खंडपीठाने आपल्या 44 पानांच्या निर्णयात म्हटले आहे की, अनेक वेळा अशा प्रकरणांमध्ये पत्नीचे आई-वडील आणि जवळचे नातेवाईक परिस्थिती आहे त्या पेक्षा मोठी बनवतात.

Court | (Photo credit: archived, edited, representative image)

HC on Matrimonial Dispute: एका महिलेने आपल्या पतीवर व कुटुंबातील सदस्यांवर हुंडा मागितल्याचा आणि अत्याचार केल्याचा आरोप करत, दाखल केलेला केलेला एफआयआर गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. यावेळी न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, सहिष्णुता म्हणजेच सहनशीलता हा चांगल्या वैवाहिक जीवनाचा पाया असला पाहिजे, परंतु अनेकदा अशा प्रकरणांमध्ये दिसून येते की, पत्नीचे कुटुंब, तिच्या माहेरचे लोक तीळाचा डोंगर बनवतात.

न्यायमूर्ती दिव्येश ए जोशी यांच्या एकल न्यायमूर्तींच्या खंडपीठाने आपल्या 44 पानांच्या निर्णयात म्हटले आहे की, अनेक वेळा अशा प्रकरणांमध्ये पत्नीचे आई-वडील आणि जवळचे नातेवाईक परिस्थिती आहे त्या पेक्षा मोठी बनवतात. खंडपीठाने म्हटले की, 'परिस्थिती बदलण्यासाठी आणि लग्न वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याऐवजी, अज्ञानामुळे किंवा क्षुल्लक मुद्द्यांमुळे किंवा पती आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांबद्दलच्या निव्वळ द्वेषामुळे विवाह पूर्णपणे नष्ट होतात.’ न्यायालयाने पुढे म्हटले की, चांगल्या विवाहाचा पाया म्हणजे सहिष्णुता, एकमेकांणा समजून घेणे आणि एकमेकांचा आदर करणे आहे. प्रत्येक विवाहात एकमेकांच्या दोषांबद्दल एक विशिष्ट प्रमाणात सहिष्णुता असणे आवश्यक आहे. क्षुल्लक भांडणे, क्षुल्लक मतभेद या सांसारिक बाबी आहेत, त्यांची अतिशयोक्ती करणे योग्य नाही. (हेही वाचा: Chhattisgarh HC on Schools Punishment: 'शिस्तीच्या नावाखाली मुलांवर होणारी शारीरिक हिंसा ही क्रूरताच'; छत्तीसगड उच्च न्यायालयाने नोंदवले निरीक्षण)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)