HC on Live In Relation: 'पाश्चात्य देशांप्रमाणे भारतात लिव्ह-इन रिलेशन सामान्य नाहीत, लोकांनी भारतातील संस्कृतीचा आदर केला पाहिजे'- Allahabad High Court

या दोघांना लग्न करायचे होते, परंतु याला मुलीच्या कुटुंबाचा विरोध होता, ज्यामुळे त्यांनी तिला जबरदस्तीने घरात डांबून ठेवले आहे.

Court | (Photo credit: archived, edited, representative image)

HC on Live In Relation and Indian Tradition: एका प्रकरणाची सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, पाश्चात्य देशांप्रमाणे भारतात लिव्ह-इन संबंध सामान्य नाहीत आणि लोकांनी भारतातील परंपरा आणि संस्कृतीचा आदर केला पाहिजे. न्यायमूर्ती शमीम अहमद यांनी 32 वर्षीय पुरुषाने (याचिकाकर्त्याने) दाखल केलेली हेबियस कॉर्पस याचिका फेटाळताना हे निरीक्षण केले, ज्याने आरोप केला होता की त्याच्या 29 वर्षीय महिला जोडीदाराला तिच्या कुटुंबीयांनी जबरदस्तीने आपल्याकडे ठेऊन घेतले आहे.

आपल्या याचिकेत आशिष कुमारने (याचिकाकर्ता) आरोप केला आहे की तो 2011 पासून महिलेशी रिलेशनशिपमध्ये आहे. या दोघांना लग्न करायचे होते, परंतु याला मुलीच्या कुटुंबाचा विरोध होता, ज्यामुळे त्यांनी तिला जबरदस्तीने घरात डांबून ठेवले आहे. ही याचिका फेटाळला न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, 'आम्ही अशा पाश्चात्य देशात राहत नाही जिथे नागरिकांमध्ये लिव्ह-इन रिलेशन खूप लोकप्रिय आणि सामान्य आहे. आम्ही अशा देशात राहतो जिथे लोक संस्कृती आणि परंपरांवर विश्वास ठेवतात, जो आपल्या देशाचा मुकुट आहे आणि आम्हाला याचा अभिमान आहे, म्हणून आम्हाला आमच्या देशाच्या परंपरा आणि संस्कृतीचा आदर केला पाहिजे.' (हेही वाचा: UP Shocker: दुबईमधून पतीने दिली पत्नीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्याची सुपारी; 4 जणांना अटक, जाणून घ्या सविस्तर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)