HC On Live-in and Divorce: लिव्ह इन रिलेशनशिपध्ये कायद्याने घटस्फोट मागता येणार नाही- हायकोर्ट
तसेच, भारतामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपला कायदेशी मान्यता नाही. त्यामुळे केवळ करारावर एकत्र किंवा सोबत राहणाऱ्या जोडप्याला घटस्फोटासाठी अर्ज करता येणार नाही, अशी टीप्पणीही हायकोर्टाने केली.
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्याचा घटस्फोटाचा अर्ज केरळ हायकोर्टाने फेटाळून लावला आहे. तसेच, भारतामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपला कायदेशी मान्यता नाही. त्यामुळे केवळ करारावर एकत्र किंवा सोबत राहणाऱ्या जोडप्याला घटस्फोटासाठी अर्ज करता येणार नाही, अशी टीप्पणीही हायकोर्टाने केली.
न्यायमूर्ती मोहम्मद मुस्ताक आणि सोफी थॉमस यांच्या खंडपीठाने म्हटले की, लिव्ह इन रिलेशनशिपला भारतात अद्याप तरी कायदेशीर मान्यता भेटली नाही. त्यामुळे कोणत्याही नातेसंबंधाला तेव्हाच कायदेशीर विभाक्त करता येते जो विवाह कायद्याला अनुसरुन झाला आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ना तलाक देता येऊ शकतो, ना घटस्फोट.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)