HC On Inter-Caste Marriage: 'अजूनही लोकांना आंतरजातीय विवाह करण्यात लाज वाटते हा समाजाचा काळा चेहरा आहे': उच्च न्यायालय

न्यायालयाने पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर म्हटले की, आंतरजातीय विवाह न करणे ही सामाजिक कुप्रथा इतकी खोलवर रुजलेली आहे की, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही आपण त्याच्याशी झगडत आहोत.

Indian Marriage | Representational Image (Photo Credits: Pixabay)

अलाहाबाद उच्च न्यायालयाने अलीकडेच एका खटल्याची सुनावणी करताना म्हटले आहे की, ‘भारतीय कुटुंबे अजूनही त्यांच्या मुलाचे किंवा मुलीचे त्यांच्या जातीबाहेर (आंतरजातीय विवाह) लग्न करू शकत नाहीत. असे केल्यास आपण समाजामध्ये तोंड दाखवू शकणार नाही, असे त्यांना वाटते व हा समाजाचा काळा चेहरा आहे.’

न्यायमूर्तींनी निरीक्षण नोंदवले, ‘या प्रकरणातील पीडित मुलगी ओबीसी समाजातील आहे, तर अर्जदार मुलगा एससी समाजातील आहे. दोघेही एकमेकांवर प्रेम करत असल्याने त्यांनी किशोरवयातच लग्न करण्याचा निर्णय घेतला. या लग्नानंतर दोघांना एक मुलगा झाला. मात्र त्यानंतरही अर्जदाराला न्यायालयीन खटल्याचा सामना करावा लागला.’ न्यायालयाने पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर म्हटले की, आंतरजातीय विवाह न करणे ही सामाजिक कुप्रथा इतकी खोलवर रुजलेली आहे की, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही आपण त्याच्याशी झगडत आहोत. (हेही वाचा: UP Shocker: प्रियकरासोबत महिला होती घरी, 5 वर्षाच्या मुलीने पाहिले, भीतीने चिमुकलीची केली हत्या)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now