HC On Extra-Marital Partner Of Husband: 'पत्नी आपल्या पतीच्या विवाहबाह्य जोडीदारावर कौटुंबिक हिंसाचाराचा खटला चालवू शकत नाही': Orissa High Court

दोन्ही स्त्रियांमध्ये (पत्नी आणि विवाहबाह्य जोडीदार) कायद्याच्या कलम 2(एफ) नुसार केवळ एकाच छताखाली राहिल्यामुळे 'घरगुती संबंध' प्रस्थापित होऊ शकत नाहीत.

Court (Image - Pixabay)

ओरिसा उच्च न्यायालयाने एक महत्वाचे निरीक्षण नोंदवत म्हटले की, पत्नी आधी फक्त पतीच्या घरात राहत असल्याने ती पतीच्या विवाहबाह्य जोडीदारावर घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत खटला चालवू शकत नाही. न्यायालयाने पुढे म्हटले आहे की, दोन्ही स्त्रियांमध्ये (पत्नी आणि विवाहबाह्य जोडीदार) कायद्याच्या कलम 2(एफ) नुसार केवळ एकाच छताखाली राहिल्यामुळे 'घरगुती संबंध' प्रस्थापित होऊ शकत नाहीत. सर्व आरोप रद्द करत न्यायमूर्ती शशिकांता मिश्रा यांच्या एकल न्यायाधीश खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले. (हेही वाचा:  पतीने चॉकलेट आणले नाही म्हणून संतापलेल्या पत्नीने केली आत्महत्या, जाणून घ्या सविस्तर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now