Hardik Pandya: 'तुझ्यावर किती प्रेम करतो हे शब्दांमधून व्यक्त होणार नाही'; मुलाच्या वाढदिवशी हार्दिक पांड्या भावूक, सोशल मीडियावर खास पोस्ट
हार्दिक पांड्याने त्याच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तो आपल्या मुलासोबत मस्ती करत असल्याचे दिसत आहे.
Hardik Pandya: टीम इंडियाचा (Indian Cricket Team)अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टॅनकोविक (Natasha Stankovic)हे एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. 4 वर्षांचा त्यांचा संसार मोडला. मात्र आज त्यांच्या मुलाचा अगस्त्य (Agastya Pandya)याचा आज वाढदिवस आहे. हार्दिक पांड्याने त्याच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तो आपल्या मुलासोबत मस्ती करत असल्याचे दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये हार्दिकने लिहिले की, 'तु मला दररोज पुढे जाण्याची प्रेरणा देतो. मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे शब्दांमधून व्यक्त करता येणार नाही,' असंही हार्दिक पांड्या पोस्टद्वारे म्हणाला. हार्दिक पांड्यासोबत घटस्फोटाची घोषणा होण्याच्या एक दिवस अगोदर नताशा तिच्या देशात सर्बियाला गेली होती. अगस्त्य आणि ती मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. काही दिवसांपूर्वी नताशा आपल्या मुलासोबत पार्कमध्ये फिरायला गेली होती. त्यावेळी तिने अगस्त्यचे काही फोटो शेअर केले होते. त्यावर हार्दिक पांड्यानेही प्रतिक्रियाही दिली होती. (हेही वाचा: Hardik Pandya Natasa Divorce: सगळ संपलं! हार्दिक पांड्याला एकाच दिवसात दोन धक्के, आधी कर्णधारपदावरुन हक्कलपट्टी आता चार वर्षांचा संसार मोडला)
हार्दिक पांड्याची पोस्ट
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 30, 2024 03:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

