Gujarat: कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे घाबरला जंगलाचा राजा, सिंहाने ठोकली धूम

भटक्या कुत्र्यांना घाबरून सिंहाने धूम ठोकल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर सध्या व्हायरल होत आहे.

सिंह (Lion) हा जंगलाचा राजा मानला जातो, सर्वात हिंस्त्र प्राणी म्हणून ओळखला जातो. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल हा राजा देखील राज्याबाहेर जाताच घाबरतो. भटक्या कुत्र्यांना (Stray Dog) घाबरून सिंहाने धूम ठोकल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर सध्या व्हायरल (Viral video) होत आहे. हा व्हिडिओ गुजरातमधील (Gujarat) गीर सोमनाथ (Gir Somnath) गावचा असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये एक सिंह रात्रीच्या अंधारात भक्षाच्या शोधात गावात शिरताना दिसत आहे. यादरम्यान गावातील भटके कुत्रे सिंहावर हल्ला करतात.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement