Gujarat Hooch Tragedy: बनावट दारू प्यायल्याने गुजरातमध्ये 13 जणांचा मृत्यू; अनेकजण रुग्णालयात भरती- Reports

पोलीस अधिकाऱ्यांनी बोटाडमध्ये पाच आणि अहमदाबादमध्ये आठ मृत्यूंची पुष्टी केली.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-Twitter)

गुजरातच्या बोटाड आणि अहमदाबाद जिल्ह्यातील लगतच्या भागांमध्ये सोमवारी बनावट दारू पिल्याने 13 जणांचा मृत्यू झाला आणि अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस अधिकाऱ्यांनी बोटाडमध्ये पाच आणि अहमदाबादमध्ये आठ मृत्यूंची पुष्टी केली. बोटाडच्या बरवाला तालुक्यातील रोजीद गावातून ही प्रकरणे सुरू झाली आणि लवकरच अनेक लोक आजारपणाची तक्रार करू लागले.

गुजरातचे डीजीपी आशिष भाटिया यांनी सांगितले की, 'दारू प्यायल्याने आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे 10 जण सध्या वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल आहेत. तीन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.'

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement