Gujarat On Habeas Corpus: जय भीम सिनेमाच्या वकील चंद्रू स्टाईलने धाकट्या भावाने थोरल्या भावाकडून मिळवला पालकांच्या वास्तव्याचा ताबा

गुजरात हायकोर्टाने या याचिकेवर युक्तीवाद करत 'हेबियस कॉर्पस' याचिकेला परवानगी दिली.

Gujrat High Court (Photo Credit - Wikimedia Commons)

एकत्र कुटुंब गुण्या गोविंदात नांदत पण विभक्त कुटुंबात होरपळ होते ती म्हाताऱ्या आई बापाची. असाचं एक मनाला चटका लावून जाणारा प्रकार गुजरातमध्ये (Gujarat) घडला आहे. म्हातारे आई वडील त्यांच्या वृध्दकाळात आपल्या थोरल्या लेकाकडे वास्तव्यास होते. पण पालक आजारी आहेत तसेच त्यांना असभ्य वागणूक दिल्याची कळताचं धाकट्या लेकाने थेट कोर्टाची पायरी चढत जय भीम (Jai Bhim) सिनेमाच्या वकील चंद्रू स्टाईलने 'हेबियस कॉर्पस' (Habeas Corpus) याचिका दाखल केली. गुजरात हायकोर्टाने या याचिकेवर युक्तीवाद करत 'हेबियस कॉर्पस' याचिकेला परवानगी दिली. तसेच आई वडीलांचा ताबा थोरल्या भावाला सोपवण्यात आला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)