Gujarat Fire Video: वापी येथील GIDC च्या केमिकल कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल

या आगीचे कारण अद्याप समजले नसून अद्यापही कोणत्या जिवीतहानीचे वृत्त नाही आहे.

गुजरातमधील वापी (Vapi) येथे एका रासायनिक कारखान्यात आज संध्याकाळच्या सुमारात भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग एवढी भीषण होती की या कारखान्याच्या बाजूच्या कारखान्यात देखील या आगीचे लोण पोहचले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. या आगीचे कारण अद्याप समजले नसून अद्यापही कोणत्या जिवीतहानीचे वृत्त नाही आहे.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)