Gujarat ATS Arrests Four ISIS Terrorists: गुजरात एटीएसला मोठे यश; 4 दहशतवाद्यांना अटक, सर्व श्रीलंकेचे नागरिक, तपास सुरु
गेल्या वर्षी पोलिसांनी पोरबंदरमधून ISIS साठी काम करणाऱ्या काही संशयितांना अटक केली होती.
Gujarat ATS Arrests Four ISIS Terrorists: गुजरात पोलिसांनी इस्लामिक स्टेटच्या चार दहशतवाद्यांना अहमदाबाद विमानतळावरून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्वजण श्रीलंकेतील रहिवासी आहेत. हे सर्वजण इस्लामिक स्टेटशी संबंधित आहेत. गुजरात पोलिसांच्या एटीएसने दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एटीएस या सर्व दहशतवाद्यांना गुप्त ठिकाणी नेऊन त्यांची चौकशी करण्यात व्यस्त आहे. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी कोणत्या उद्देशाने पोहोचले, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षी पोलिसांनी पोरबंदरमधून ISIS साठी काम करणाऱ्या काही संशयितांना अटक केली होती. गुजरात पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना देशात मोठा दहशतवादी हल्ला करण्यासाठी श्रीलंकेतून पाठवण्यात आले होते. ते श्रीलंकेहून चेन्नईमार्गे अहमदाबादला पोहोचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अहमदाबाद येथून लक्ष्यित ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच त्याला गुजरात एटीएसने अटक केली. (हेही वाचा: Uttar Pradesh Crime: गाझियाबादमध्ये घरात घुसून गोळीबार, घटना CCTV कैद, गुन्हा दाखल)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)