GST Council Meet: सिनेमागृहातील खाद्यपदार्थ होणार स्वस्त, तर ऑनलाइन गेमिंग, हॉर्स रायडींग आणि कॅसिनो महागणार; जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय
यासह न शिजवलेल्या स्नॅक्सवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे. या परिषदेमध्ये कर्करोगाने त्रस्त रुग्णांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.
नवी दिल्लीत जीएसटी कौन्सिलच्या 50 व्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यातील सर्वात मोठा निर्णय म्हणजे, जीएसटी परिषदेने ऑनलाइन गेमिंग, घोडेस्वारी आणि कॅसिनोवर 28% कर लागू करण्यास मान्यता दिली. यापूर्वी यांवर 18 टक्के कर होता. त्याचबरोबर सिनेमागृहातील खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थांवरील बिलावरील जीएसटी कमी करण्याच्या शिफारशीलाही मंजुरी देण्यात आली. आता त्यांच्यावर 18 टक्क्यांऐवजी 5 टक्के जीएसटी लावला जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत या सर्व निर्णयांची माहिती दिली.
यासह न शिजवलेल्या स्नॅक्सवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे. या परिषदेमध्ये कर्करोगाने त्रस्त रुग्णांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. सरकारने सांगितले की, आयात केलेल्या कर्करोगाच्या औषधांवर आयजीएसटी आकारला जाणार नाही. कॅसिनो, घोडेस्वारी आणि ऑनलाइन गेमिंगवर जीएसटी लावण्याचा विचार करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या एका समितीने मंत्री गटाच्या शिफारशीवर आधारित निर्णय घेतला आहे. जीएसटी कौन्सिलने ऑनलाइन गेमिंगला झटका दिला आहे, त्यामुळे बुधवारी ऑनलाइन गेमिंग स्टॉकवर सर्वांचे लक्ष असेल. (हेही वाचा: Uttar Pradesh Shocker: बेरोजगार व्यक्तीला 2.5 कोटींच्या टर्नओव्हरसाठी GST नोटीस; लाखो रुपये भरण्याचे आदेश, जाणून घ्या प्रकरण)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)