Gross GST Collections: फेब्रुवारीमध्ये सकल जीएसटी संकलनात 12.5% वाढ; प्राप्त झाले 1.68 लाख कोटी रुपये
फेब्रुवारी 2024 पर्यंत, चालू आर्थिक वर्षातील एकूण जीएसटी संकलन 18.40 लाख कोटी आहे, जे आर्थिक वर्ष 2022-23 मधील याच कालावधीतील संकलनापेक्षा 11.7% जास्त आहे.
Gross GST Collections: फेब्रुवारी 2024 साठी एकत्रित वस्तू आणि सेवा कर (GST) महसूल 1,68,337 कोटी प्राप्त झाला आहे, जो 2023 मधील त्याच महिन्याच्या तुलनेत 12.5% वाढला आहे.
देशांतर्गत व्यवहारातून गीएसटीमध्ये 13.9 टक्के वाढ आणि वस्तूंच्या आयातीतून जीएसटीमध्ये 8.5 टक्के वाढ झाली. फेब्रुवारी 2024 साठी परताव्याचे जीएसटी महसूल 1.51 लाख कोटी आहे, जे मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 13.6% वाढले आहे.
फेब्रुवारी 2024 पर्यंत, चालू आर्थिक वर्षातील एकूण जीएसटी संकलन 18.40 लाख कोटी आहे, जे आर्थिक वर्ष 2022-23 मधील याच कालावधीतील संकलनापेक्षा 11.7% जास्त आहे. आर्थिक वर्ष 2023-24 साठी सरासरी मासिक सकल संकलन 1.67 लाख कोटी आहे, जे मागील वर्षाच्या संबंधित कालावधीत गोळा केलेल्या 1.5 लाख कोटींपेक्षा जास्त आहे. (हेही वाचा: India's GDP Growth: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक बाब; तिसऱ्या तिमाहीत तब्बल 8.4% ची जीडीपी ग्रोथ)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)