अँटिलियामधून आनंदाची बातमी! Mukesh Ambani पुन्हा एकदा झाले आजोबा, Akash व Shloka यांना कन्यारत्न
त्यावेळी श्लोका मेहता तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसली होती.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलामधून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि सून श्लोका मेहता यांना कन्यारत्न झाले आहे. हे जोडप्याचे दुसरे अपत्य आहे. आकाश आणि श्लोका यांना पृथ्वी अंबानी नावाचा मुलगा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आकाश आणि श्लोका यांच्या मुलीचा जन्म बुधवारी झाला. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी आपल्या कुटुंबासह सिद्धी विनायक मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यावेळी श्लोका मेहता तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसली होती. जेव्हा अंबानी कुटुंबाने कल्चरल सेंटरच्या ओपनिंग पार्टीचे आयोजन केले होते, तेव्हा श्लोकाच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची बातमी तेव्हा समोर आली. 9 मार्च 2019 रोजी आकाश आणि श्लोका मेहता विवाहबंधनात अडकले होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)