Goods Train Derails In Jharkhand: झारखंडमध्ये मालगाडी रुळावरून घसरली; हटिया आणि गोड्डा एक्सप्रेस रद्द
या अपघातानंतर रेल्वे रुळाला तडे गेल्याने टाटानगर स्थानकातून जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आली.
Goods Train Derails In Jharkhand: झारखंडमधील सरायकेला जिल्ह्यात मालगाडी रुळावरून घसरली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नसले तरी यामुळे रेल्वे रुळ पूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. झारखंडमधील सरायकेला जिल्ह्यातील चंदिलमध्ये हा रेल्वे अपघात झाला. सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास चांदिल स्थानकाजवळ मालगाडी मोठ्या आवाजात रुळावरून घसरली. या अपघातानंतर रेल्वे रुळाला तडे गेल्याने टाटानगर स्थानकातून जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आली. तथापी, हातिया एक्सप्रेस आणि गोड्डा एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.
झारखंडमध्ये मालगाडी रुळावरून घसरली, पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)